रेशनवर तांदूळ ३ तर गहू २ रुपये किलो

rice

मुंबई, 14 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कौटुंबिक शिधापत्रिकेवर फेब्रुवारी 2017 साठी देण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे परिमाण जाहीर झाले आहे. कुटुंबातील लाभार्थीसाठी शिधापत्रिकेवर वितरीत करावयाच्या धान्याचे परिमाण प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ 3 रुपये प्रतिकिलो आणि 3 किलो गहू 2 रुपये प्रतिकिलो असे आहे.

  • धान्य वाटप

अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थीसाठी शिधापत्रिकेवर एकूण 35 किलो धान्य देण्यात येणार आहे. त्यापैकी 18 किलो तांदूळ 3 रुपये प्रतिकिलो व 17 किलो गहू 2 रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध होणार आहे. दारिद्र्य रेषेखालील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसाठी माहे फेब्रुवारी 2017, या महिन्यासाठी साखरचे प्रमाण दर माणसी 500 ग्रॅम प्रमाणे 13.50 रुपये प्रतिकिलो दराने देण्यात येणार आहे. त्यासाठी 867 क्विंटल साखर मंजूर करण्यात आली असून, मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी साखरेच्या एकूण आवशकतेच्या 100 टक्के ऐवढे आहे.

  • केरोसिन वाटप

या क्षेत्रासाठी 5916 किलो लिटर रॉकेल मंजूर करण्यात आले आहे. बिगर गॅसधारक शिधापत्रिका धारकांसाठी एक व्यक्तीसाठी 2 लिटर, 2 व्यक्तिंसाठी 3 लिटर आणि 3 व त्यावरील व्यक्तिंसाठी 4 लिटर रॉकेल वाटप करण्यात येणार आहे. केरोसिनचा किरकोळ दर 18.77 रुपये प्रतिलिटर असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी दिली आहे.