मेन आणि हार्बरवर आज (13 ऑगस्ट) मेगाब्लॉक

मुंबई, 13  ऑगस्ट 2017/AV News Bureau:

रेल्वे रुळांच्या देखभालीसाठी तसेच तांत्रिक दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने आज (13 ऑगस्ट रोजी) मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (mega block) जाहीर केला आहे. या काळात दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

माटुंगा-मुलुंड डाउन फास्ट मार्गावर सकाळी 10.15 ते दुपारी 3.15 या काळात mega block

  • सकाळी 9.38 ते दुपारी 2.54 या काळात सीएसएमटी वरून सुटणाऱ्या डाउन फास्ट आणि सेमी फास्ट मार्गावरील सर्व गाड्या माटुंगा स्टेशनपासून स्लो मार्गावर चालविण्यात येतील आणि शीव तसेच मुलुंड स्थानकांच्यादरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येईल. या गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील. ठाण्याहून पुढे जाणाऱ्या डाउन फास्ट मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाउन फास्ट मार्गावर चालविण्यात येतील.
  • सकाळी 10.46 ते दुपारी 3.18 या काळात ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व अप फास्ट आणि सेमी फास्ट मार्गावरील गाड्या आपल्या नेहमीच्या थांब्याव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावतील.
  • सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व स्लो मार्गावरील गाड्या 10 मिनिटे उशिराने धावतील.

 

  • लांब पल्ल्याच्या गाड्या

मेगाब्लॉकच्या काळात सीएसएमटी आणि दादरहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान स्लो डाउन मार्गावर चालविण्यात येईल. या गाड्या 30 मिनिटे उशिराने धावतील.

 

हार्बर मार्गावर mega block

  • सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या काळात तसेच चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या काळात मेगाब्लॉक राहणार आहे.
  • सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 या काळात सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या गाड्या आणि सकाळी 10.38 ते सायंकाळी 4.43 या काळात सीएसएमटीवरून वांद्रे, अंधेरीसाठी सुटणाऱ्या गाड्या रद्द् करण्यात आल्या आहेत.
  • सकाळी 9.52 ते दुपारी 3.26 या काळात पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या आणि सकाळी 10.44 ते दुपारी दुपारी 4.13 या काळात अंधेरी, वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या गाड्या बंद राहतील.

 

विशेष गाड्या चालविणार

  • मात्र मेगाब्लॉकच्या काळात पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून) विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.

 

mega block  मुळे मेन आणि पश्चिम मार्गावरून प्रवासाची मूभा

  • मेगाब्लॉकच्या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या काळात मेन लाइन तसेच पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.