अटल करंडक 2016 एकांकिकांची अंतिम फेरी सुरू

नवी मुंबई , 8 जानेवारी/AV News Bureau:

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई व कोकण विभागस्तरीय अटल करंडक 2016  एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरी 7 जानेवारीपासून सुरू झाल्या. पनवेल येथील फडके नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.

पनवेल येथील फडके नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला अभिनेते भरत सावले, अभिनेते जयवंत वाडकर, अभिनेते समीर खांडेकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, सिने-नाट्य निर्माती कल्पना कोठारी, ज्येष्ठ गजलकार ए.के. शेख, मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट वेल्फेअरचे संचालक डॉ.सुनिल पाटील, प्रमुख कार्यवाह शामनाथ पुंडे, अमोल खेर, स्मिता गांधी, गंभीर दांडेकर, डॉ.भूषण लांगी, अभिषेक पटवर्धन, प्रितम म्हात्रे आदी उपस्थित होते.