मुंबादेवी मतदारसंघासाठी डायरीचेमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, 8 जानेवारी /AV News Bureau :
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते व मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी माजी आमदार अतुल शाह यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात वितरित करण्यासाठी तयार केलेल्या २०१७ च्या डायरीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत योजनेनुसार यंदाच्या डायरीचा विषय स्वच्छता हा आहे. मुंबई शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवरही त्यामध्ये भर देण्यात आला आहे. मुंबईमध्ये कुलाबा परिसरात काळा घोडा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी डायरीचे प्रकाशन केले. यावेळी आमदार राज पुरोहित, मुंबादेवी भाजपा अध्यक्ष जयेश शाह, मुंबई भाजपा सचिव प्रेमशंकर पांडे, मुंबादेवी भाजपा उपाध्यक्ष प्रेम शर्मा आणि भारत पुरोहित तसेच शिवाजी झवर आणि इम्रान सोळंकी उपस्थित होते.
Attachments area