मंबई महापालिका निवडणुकीसाठी सपाची यादी जाहीर

मुंबई, १० जानेवारी २०१७ /AV News Bureau :

मुंबई महापालिकेची आगामी निवडणुक समाजवादी पार्टी स्वबळावर लढणार असून पक्षातर्फे ११७ वॉर्डांमध्ये उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. यातील २४ जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव या निकषांवर पक्षाच्या उमेदवारांची निवड केली जात असून टप्प्याटप्प्याने पुढील याद्या जाहीर केल्या जातील, असे  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी  सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्ही पुर्ण तयारीनिशी स्वबळावर मैदानात उतरत आहोत. महापालिकेच्या एकूण २२७ पैकी पक्षाचा प्रभाव असलेल्या ११७ वॉर्डांमध्ये समाजवादी पार्टी आपले उमेदवार उभे करणार  आहे. या निवडणूकीत एमआयएमचे फारसे आव्हान आम्हाला जाणवत नसून या निवडणुकीत मुंबईकरच त्यांना योग्य ते उत्तर देतील, असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी सांगितले की, मुलायम सिंह यादव यांनी किमान तीन महिन्यांसाठी पक्षाचे नेतृत्व अखिलेश यादव यांच्या हाती द्यावे. आम्हाला पुर्ण विश्वास आहे की, अखिलेश राज्यात पुन्हा समाजवादी पार्टीची सत्ता निश्चितच आणतील, असेही ते म्हणाले.

 वॉर्ड क्रमांक निहाय उमेदवारांची यादी

३ – सूर्यबली कैलाश यादव

२० – मोहम्मद हारून चौधरी

३९ – रेखा राजमणि गुप्ता

४९ – रेश्मा इरशाद खान

५६ – वैजयंती राजी शेट्टी

६१ – गायली देवी राम गोविन्द सिंह

९० – बेनिडिक्ट डेनिस किन्नी

१३३ – अब्दुल अजीज अतीक शेख

१३६ – रुखसाना नजीम सिद्दीकी

१३८ – रजिया सुल्ताना इमरान शेख

१३९ – अख्तर अब्दुल रज्जाक कुरैशी

१४० – शेख आयेशा अनीस

१४१ – नदीम मोहम्मद रफीक दुरानी

१५९ – खान अब्दुल रहीम कमरुद्दीन

१६४ – इशाक शेख

१६८ – आसमा मुददसर शेख

२०१ –  इमरान साजिद सिद्दीकी

२११ – रईस कसम शेख

२१२ – रुखसाना सईद

२१३ – वसीम मसूद सैय्यद

२१५ – निशा गौतम धारी

२२० – मोहमद हनीफ अब्बास मंसूरी

२२३ –  शेख निदा फातिमा

२२६ –  रेखा आशीष कुमार सिंह