मनसे नेते रविंद्र धंगेकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

DSC_0945

मुंबई, 30 जानेवारी 2017/AV News Bureau:

मनसे नेते तसेच पुणे महापालिकेतील माजी गटनेते रविंद्र धंगेकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धंगेकर यांच्या प्रवेशामुळे पुणे शहरात काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असून धंगेकर यांना काँग्रेस पक्षात योग्य सन्मान दिला जाईल, असे चव्हाण म्हणाले.

या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, कृपाशंकर सिंह, विधानपरिषदेतील कॉँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार शरद रणपिसे, पुणे काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, महिला कॉँग्रेस प्रेदशाध्यक्षा ऍड. चारूलता टोकस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, रोहित टिळक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.