ठाणे  महानगरपालिकेमध्ये मतदान प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

thane vote

ठाणे10 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७  सुरळीत पार पाडण्यासाठी विविध आस्थापनातील कर्मचाऱ्यांना आज नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले .

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान प्रकिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष ,कक्ष अधिकारी १,२,३ आधी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना हे  प्रशिक्षण देण्यात आले .

या प्रशिक्षणात सर्व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करावे  तसेच  EVM मशीनचा वापर कशा पद्धतीने करावा या संर्दभात  प्रशिक्षण देण्यात आले .या  प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व आधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.