दूधाचे दर वाढणार

  • दूध उत्पादकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न
  • दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसण्याची भिती

नवी मुंबई,11 जून 2017/AV News Bureau:

कर्जमाफीसह कृषी मालाला हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी गेले अनेक दिवस संपाचे हत्यार उगारलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत दूधाचे वाढीव दर निश्चित करण्यात येणार आहेत. नवीन दरामुळे दूध उत्पादकांना गाईच्या दूधासाठी प्रतिलिटर 24 ऐवजी 27 तर म्हशीच्या दूधासाठी 33 ऐवजी 37 रुपये असा दर मिळणार आहे. दरम्यान या दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

दूधाचे दर वाढवावे अशी मागणी सातत्याने दूध उत्पादकांकडून केली जात आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी  राज्य सरकारने दूधाचे नवीन दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन तीन दिवसांत दूधाचे वाढीव दर लागू करण्यात येणार असल्याची माहिती दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी काल औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

दूधाचे नवे दर लागू झाल्यानंतर सर्व दूध संघांना नवीन दर दूध उत्पादकांना देणे बंधनकारक असणार आहे.