भाजयुमो मुंबईची नवी कार्यकारिणी जाहीर

मुंबई, 11 एप्रिल 2017/AV News Bureau:

नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर लढलेल्या अनेक तरुण चेहऱ्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता, संघटनात्मक स्तरावरही अधिकाधिक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई भाजयुमोची(bjp mumbai yuva team) नवी कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष पुनम महाजन आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनानुसार भायुमोचे मुंबई अध्यक्ष मोहित कंबोज यांनी नव्या कार्यकारिणीचे पुनर्गठन केले आहे. यामध्ये मुंबई महापालिकेत निवडून गेलेल्या पाच तरूण नगरसेवकांचाही नव्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

नव्या कार्यकारिणीत भाषानिहाय तसेच क्षेत्रनिहाय प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून समाजाच्या प्रत्येक वर्गाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. युवकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारसोबत उत्तम समन्वय राखत काम करण्यावर आमचा भर असेल. तसेच राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी योजनांची माहिती जनतेपर्यंत विशेष करून तरूण वर्गापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे कंबोज यांनी सांगितले. भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष यांनी घोषित केल्याप्रमाणे भाजयुमोचीbjp mumbai yuva team नवी कार्यकारणी पुढील प्रमाणे:

  • उपाध्यक्ष

 सागर सिंह ठाकूर, शीतल गंभीर, हर्ष पटेल, प्रिती साटम, रोहन राठोड,नैनेश शहा, योगेश गिरकर, शंतनु अगस्ती, अमित शेलार, शायली कुलकर्णी आणि अमर पावले

  • संघटना महामंत्री

 तेजेंदर सिंह तिवाना,

  • महामंत्री

 हर्ष मेहता, निखिल व्यास, मनोज कुमार तिवारी, वाहिद शहा

  • मंत्री

 हर्षल मंत्री, परमजीत सिंह नंदजोग, राज नथानी, अविनाश राय, तहवेश शेख,जय नगवणी, आशीष साळसकर, हर्षद भिडे आणि वरूण घैसास

  • कोषाध्यक्ष

 गोपाळ दळवी

  • युवती मोर्चा अध्यक्ष

 अंकिता चौधरी

  • स्पोर्टस सेल प्रमुख

 कुणाल केरकर

  • सोशल मिडिया प्रमुख

 अभिषेक त्रिपाठी,

  • सहप्रमुख

 राज कार्ला

  • लिगल सेल प्रमुख

 विकास सिंह गौर

  • सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख

 श्रीधर वर्कोल

  • सहप्रमुख

आदित्य जैन

  • महाविद्यालय प्रमुख

 श्रेयश शहा

  • कार्यकारिणी सदस्य

 नितीन गावडे, हिमांशु पडवळ, दीपक सावंत, विक्रम मल्होत्रा आणि राजू अंबतोर