वीज पुरवठा माहितीसाठी ‘ऊर्जा मित्र ॲप’

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्र्यांच्या हस्ते ॲपचे उद्‌घाटन          

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2017:

नागरिकांना होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबतची ताजी माहिती तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी ‘ऊर्जा मित्र ॲप’ (urja mitra app)तयार करण्यात आले आहे. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियूष गोयल यांनी आज ‘ऊर्जा मित्र ॲप’(urja mitra app)चे उद्‌घाटन केले.

(urja mitra app)‘ऊर्जा मित्र ॲप’च्या सहाय्याने नागरिकांना ऊर्जा पुरवठाबाबतची ताजी माहिती मिळू शकेल, अशी माहिती एका मध्यवर्ती मंचासह वेबपोर्टल आणि मोबाइल ॲप प्रदान करणारी ही पहिलीच सेवा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच देशाला 24 तास दर्जेदार आणि अखंड वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.