टाइगर इज बॅक

  • सलमानचा टायगर जिंदा है ख्रिसमसला प्रदर्शित होण्याची शक्यता
  • टायगर जिंदा है पहिले पोस्टर झळकले

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अॅक्शन हिरोच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक था टायगर मालिकेतील दुसरा चित्रपट असणारा टायगर जिंदा है येत्या डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर मोठ्या पडदयावर झळकण्याची दाट शक्यता आहे. टायगर इज बॅक असे म्हणत सलमान खानने आपल्या चित्रपटाचे नवे पोस्टर लोकांसमोर आणले आहे. या पोस्टरने सलमानच्या चाहत्यांना चांगलीच भूरळ पाडली आहे.

 

पाच वर्षांपूर्वी सलमान खान आणि कतरिना कैफ या जोडीचा एक था टायगर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. सलमानसोबत कतरिना कैफने केलेले स्टंट लोकांना चांगलेच पसतीला उतरले होते. त्यामुळे टायगरचा सिक्वेल कधी येणार याची प्रेक्षकांना प्रतिक्षा होती. कतरिना आणि सलमान यांची लवस्टोरी चांगलीच चर्चेत राहीली होती. पडद्यावरही या दोघांची जोडी बघण्यास फॅन्ससाठी मेजवानीच ठरते. त्यामुळे दोघे पुन्हा कधी एकत्र येणार याकडे लक्ष लागले होते. मात्र आता साऱ्यांची प्रतिक्षा संपणार असून डिसेंबरमध्ये टायगर जिंदा है मधून दोघेही पुन्हा एकत्र पडद्यावर झळकणार आहेत.

 

  • टायगर जिंदा है या पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना जबरदस्त एक्शन लूकमध्ये दिसत आहेत. या पोस्टरवरूनच चित्रपटात भरपूर हाणामारी असणार हे नक्की. आपल्या चित्रपटाच्या नव्या पोस्टरबाबत सलमानने म्हटले आहे की, टायगर इज बॅक’.

 

  • टायगर जिंदा है च्या शेवटच्या गाण्याचे शुटींग  ग्रीसमध्ये सुरू आहे. या चित्रपटाचे बहुतेक शुटींग सप्टेंबरमध्ये पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचा क्लायमेक्स नुकताच अबु धाबीमध्ये चित्रित केला गेला. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रण परदेशात झाले असून काही भाग ऑस्ट्रीयातही शूट झाले आहे. अली अब्बास झफर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अली यांच्यासोबत सलमानने केलेला सुलतान चांगलाच गाजला. त्यामुळे हादेखील चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.