उद्धव ठाकरे 26 जानेवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर

मुंबई, 22 जानेवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज :

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 26 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

  • एक दिवसाच्या या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वेंगुर्ला येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाचे भूमीपुजन करण्यात येणार आहे.
  • सकाळी होणाऱ्या या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे दुपारी आंगणेवाडी येथील श्री भराडी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत.

दरम्यान, या दौऱ्यात उद्धव ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

===================================================================================================

इतर बातम्या

अंगणेवाडी जत्रेसाठी आणखी विशेष रेल्वेगाड्या
https://goo.gl/AikkeE