कडोंमपा क्षेत्रात लवकरच क्लस्टर डेव्हलपमेंट

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,  7 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समुह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) लागू करण्याबाबत एक महिन्याच्या आत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करण्याबाबत सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले, एमएमआर क्षेत्रात क्लस्टर डेव्हलपमेंटची मागणी येत होती. त्याचा विचार करता नवीन सामायिक डिसीआर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून याबाबत एक महिन्याच्या आत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.