रस्ता  रूंदीकरणासाठी ८९ निवासी  बांधकामावर हातोडा

 ठाणे,16 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

ठाणे महापालिकेच्या  वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील डी पी रस्ता रूंदीकरणातंर्गत हरदासनगर येथील ८९ बाधित अनधिकृत बांधकामावर अतिक्रमण विभागाच्यावतीने  कारवाई  करण्यात आली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानुसार  ही कारवाई करण्यात आली.

या कारवाई अंतर्गत  हरदास नगर येथील ८९ निवासी स्वरूपाची  बांधकामे संपूर्णत: निष्काषित करण्यात आली. त्याचबरोबर ४ कमर्शिअल बांधकामे देखील निष्कासित करण्यात आली.

ठाणे महापालिका उप आयुक्त अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित, स्थानिक कार्यकारी अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या सोबत  पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली.