गुढी पाडव्यानिमित्ताने हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द

मुंबई, 18 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज:

  • गुडीपाडव्यानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने रविवारी 18 मार्च रोजी हार्बरमार्गावरील मेगाब्लॉक रद्द केला आहे. दरम्यान, मेन लाइनवरील कल्याण-ठाणे दरम्यानचा मेगाब्लॉक जाहीर केल्याप्रमाणे राहणार आहे.
  • रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी मध्य रेल्वेतर्फे  दर रविवारी मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात येतो. मात्र उद्या गुडीपाडवा सण असल्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी हार्बर मार्गावरील कुर्ला-मानखूर्ददरम्यान मेगाब्लॉक ठेवलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना हार्बर मार्गावर प्रवास करता येणार आहे.
  • दरम्यान, मेन लाइनवरील कल्याण-ठाणे अप फास्ट मार्गावरील मेगाब्लॉक कायम ठेवण्यात आला आहे.  त्यामुळे सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 या काळात फास्ट मार्गावरील वाहतूक स्लो मार्गावरून चालविण्यात येणार आहे.