केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सलमान खानला भेटले

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 8 जून 2018:

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला यशस्वीरित्या चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे देशभर चालू असलेल्या ‘संपर्क से समर्थन’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभिनायनाअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी मुंबईत चित्रपट पटकथा लेखक सलीम खान, अभिनेते सलमान खान यांची भेट घेतली.

 

नितिन गडकरी यांनी येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर व त्यांची पत्नी यांचीही भेट घेतली. गडकरी यांच्यासमवेत भाजपचे आमदार राज पुरोहित होते.

  • दरम्यान, नुकतेच मुंबई दौऱ्यावर येऊन गेलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित यांची भेट घेतली होती.

इतर बातम्यांचाही मागोवा…

अमित शाह यांनी रतन टाटा, माधुरी दिक्षितची भेट घेतली
https://goo.gl/xySNH1