विजय साळे यांनी स्वखर्चाने बेंचेस बसविले

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई,१२ सप्टेंबर २०१९

जुईनगर परिसरातील युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विजय साळे यांनी स्वखर्चाने परिसरात नारिकांना बसण्यासाठी बेंचेस बसवून घेतले. ज्येष्ठ नागरिक सानप यांच्याहस्ते या बेंचेसचे उद्घाटन करण्यात आले.

  • गेली कित्येक दिवस नागरिकांना बसण्यासाठी अपुऱ्या आसन व्यवस्था होती नागरिकांनी याप्रकरणी विजय साळे यांच्याकडे पुरेशी आसन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली. नागरिकांच्या विनंतीला मान देत विजय साळे यांनी तातडीने स्वखर्चाने बेंचेस आणून बसविले. विजय साळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या बॅंचेसमुळे नागरिकांनी विशेषतः जुईनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी साळे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे कौतूक केले.

दरम्यान, जुईनगर परिसरात मी राहत असलो तरी नवी मुंबईतील कोणत्याही भागातील नागरिकांनी आपल्या समस्या माझ्यापर्यंत आणल्या तर मी त्या नक्की सोडविण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन विजय साळे यांनी दिले.

=====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा