भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सीवूड येथे आंदोलन

माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,१२ डिसेंबर २०२०

पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई सीवूड भाजपच्यावतीने आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे तसेच जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत जाधव यांच्या नेतृत्वाखाली सीवूड सेक्टर ४२ येथे शनिवारी संध्याकाळी निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे.पी. नड्डा यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करीत तृणमूल कॉंग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तसेच या हल्ल्यातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक भरत जाधव यांनी केली.

या आंदोलनाला भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत जाधव यांच्यासह नवी मुंबई जिल्हा युवाध्यक्ष दत्ता घंगाळे, जयवंत तांडेल, विनायक गिरी, अरविंद वाढवणे, मंगला घरत, प्रसाद ठाकूर,लालजी बंगारी, संदीप कुलकर्णी, हेम पांडे, चंदन तिवारी आदी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • =======================================================================
    मागील बातम्यांचाही मागोवा