स्वच्छ नवी मुंबईच्या शिल्पकारांचा आपतर्फे गौरव

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 223 नोव्हेंबर 2021

नवी मुंबईला स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सफाई कामगारांचा नवी मुंबई आपतर्फे आज गौरव करण्यात आला. कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यान डम्पिंग ग्राउंड येथे जावून फुले देऊन सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आपचे नवी मुंबई कार्यकारी अध्यक्ष शाम कदम, नीना जोहरी, सुमित कोटीयन,चिन्मय गोडे, कौशलसिंग, प्रमोद महाजन आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप