नवी मुंबई महापालिका महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साजरी केली वटपौर्णिमा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 11 जून 2025

वटपौर्णिमा सणाच्या निमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाबाहेर अधिकारी कर्मचारी महिलांनी वडाचे वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यामध्ये उद्यान विभागाच्या परिमंडळ 2 उपआयुक्त नयना ससाणे, सचिव  चित्रा बाविस्कर,   उपायुक्त  संघरत्ना खिल्लारे, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग उपआयुक्त ललिता बाबर, उपआयुक्त स्मिता काळे, सहा.आयुक्त अनुराधा बाबर, स्वरूपा परळीकर, अलका महापूरकर आणि महिला अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

वडाचे झाड हे दीर्घायुष्याचे व स्थिरतेचे प्रतिक मानले जात असून महानगरपालिकेच्या महिला अधिकारी, कर्मचारी यांनी  वटपौर्णिमेच्या सणाचे धार्मिक व्रतपालन करतांनाच पर्यावरणशील दृष्टीकोन जपत वडाच्या लागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला.

आपण केवळ एक झाड लावत नाही तर भावी पिढ्यांसाठी शुध्द पर्यावरणाची  रुजवात करत आहोत अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी उद्यान विभागाचे परिमंडळ 1 उपआयुक्त किसनराव पलांडे , इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अशाच प्रकारे वडाच्या  वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम सेक्टर 1 सीबीडी बेलापूर येथील मँगो गार्डन मध्ये उद्यान व समाजविकास विभागाच्या वतीने राबविण्यात आला. याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्यासह उद्यान अधिक्षक प्रकाश गिरी, समाज सेवा अधिकारी प्रकाश कांबळे तसेच महिला बचत गटाच्या सदस्य मोठया संख्येने उपस्थित होत्या.

========================================================