कल्पतरू रिव्हरसाईडजवळ रस्त्याचे डांबरीकरण

पनवेल2 डिसेंबर 2016 / AV News Bureau :

कल्पतरू रिव्हरसाईड येथील रस्त्याचे मोफत डांबरीकरण करण्यात येत आहे. कल्पतरू रिव्हरसाईड मित्र मंडळाच्या विनंतीला प्रतिसाद देत टीआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक  आणि भाजपचे युवा नेते परेश ठाकूर यांनी जागेची पाहणी करून डांबरीकरणाचे काम करून घेतले.

शहरातील कल्पतरू रिव्हरसाईड सोसायटी येथील ‘कल्पतरू रिव्हरसाईड मित्र मंडळ’ यांच्या पदाधिकाऱ्यांनी परेश ठाकूर यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती. नागरिकांच्या विनंतीनुसार ठाकूर यांनी डांबरीकरणाचे काम सुरू केले. राजू  म्हात्रे यांनी हा रस्ता होण्यासाठी आवश्यक जागा देऊ केली आहे.

यावेळी पालिकेचे माजी सभापती अनिल भगत,भार्गव ठाकूर,प्रशांत ठाकूर,संतोष इंगळे,मनोज आंग्रे,दिलीप घरत, पनीर सेलवन,नितीन ठाकूर,रवी म्हात्रे,स्वाती शेठीया,लक्ष्मीबाई, सुरेखा इंगळे, संजय कांबळे, मकरंद जाधव, श्याम अडसूळ, प्रशांत टाकळे, प्रतीक गोयल, अभिजित पाटील, संदीप साळूंखे, धवल सयकर, पराग ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते.