भाजपाच्या चतुर्थ वर्षापुर्तीचा युवक काँग्रेसतर्फे निषेध

  • दुर्बिनीद्वारे शोध घेतला असता विकास पुरुष व्यापाऱ्याचा शोध लागला – युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत भगत

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 31 ऑक्टोबर 2018:

भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकार खोटारडे आणी निष्क्रिय असल्याचा आरोप करीत वाशी रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी मोर्चाचे आयोजन करून निषेध व्यक्त केला. यावेळी विविध योगासनांचा आधार घेत विडंबनाद्वारे भाजप सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.

  • सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारला तरुणांना रोज़गार, महिलांना संरक्षण,शेतकऱ्यांनाक़र्ज़माफ़ी व वाढत असलेली महागाई कमी करण्यासाठी बसवलेले असताना ४ वर्षपूर्ण झाली तरी कुंभकर्णा सारखे झोपेचे सोंग घेतलेल्या  भाजपा सरकारला आम्ही उठवण्यासाठी घंटानाद केल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत यांनी सांगितले.

 

  • याशिवाय दुर्बीणीद्वारे वाशी रेल्वे स्टेशन परिसरात विकासाचा शोध घेतला असता अनिल अंबानी, निरव मोदी,विजय माल्ल्या,गौतम आदानी,मुकेश अंबानी,रामदेव बाबा,यांच्या सारख्या विकास पुरुष व्यापार्यांचां शोध लागल्याचेही भगत यांनी सांगितले.

 

या निदर्शनांच्या वेळी नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते  दशरथ भगत, युवक काँग्रेस नवी मुंबई प्रभारी  मयूर जयस्वाल, युवक जिल्हा अध्यक्ष निशांत भगत, प्रदेश पदाधिकारी  पंकज जगताप, जिल्हा पदाधिकारी  सुरेश नायडू, इरफान पटेल, निजाम शेख, क प्रभाग समिती सदस्य संजय यादव, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस चंद्रकला नायडू, बंटी सिंग, शैलेश घाग, युवक काँग्रेस पदाधिकारी  अनिकेत देशमुख, उमेश जुनघरे, आदिल शेख, सचिन शिंदे, अर्जुन चौधरी, रोनाक छेद्धा  बालाजी यादव, तौसिफ़ शेख,  श्रीकांत ठोंबरे,  रोशन थॉमस,  विजय पवार,  विनोद पाटील, विजय पाटील व शेकडो युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

 

======================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • संघर्ष पुनर्वसनाचा… संघर्ष पुनर्विकासाचा- दशरथ भगत