राजीव गांधी स्टेडियममध्ये क्रिकेट प्रशिक्षण वर्ग

नवी मुंबई, 2 डिसेंबर 2016/ AV News Bureau :

नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा येथील क्रीडा प्रशिक्षण केंद्रामध्ये क्रिकेट खेळाचे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत

हे क्रीडा प्रशिक्षण केंद्र मे 2017 अखेरपर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच या  क्रीडा प्रशिक्षण केंद्राची वेळ सायंकाळी 4.00 ते 6.30 वाजेपर्यंत असेल.

या क्रिकेट प्रशिक्षण वर्गात प्रवेशाकरीता सी.बी.डी,बेलापूर येथील सेक्टर 3 मध्ये असणाऱ्या राजीव गांधी क्रीडा संकुल कार्यालयात 022- 27573294 या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रवेशसंख्या मर्यादित राहील याची कृपया नोंद घ्यावी व या क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.