ठाण्यातील 4 बारवर बुलडोझर

ठाणे,27 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

ठाणे शहरातील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर यांच्यावर तीन दिवसात कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर आज नौपाड्यातील तीन आणि उपवन येथील एका बारवर जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये नौपाडा प्रभाग समितीमधील शिल्पा, अॅंटीक पॅलेस,पुष्पा विहार तर उपवन येथील सूर संगीत बारवर कारवाई करण्यात आली. दरम्यान कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर्सना नोटीस देण्यात आली आहे.         action against illegal bars

  • पोलिस बंदोबस्तात आराधना टॉकीज समोरील तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम असलेल्या शिल्पा बारवर कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाने शिल्पा बारमधील बेकायदा करण्यात आलेले त्याचप्रमाणे अंतर्गत बदल करून केलेले बांधकामही तोडून टाकण्यात आले.
  • तीन पेट्रोल पंप येथील बहुचर्चित अँटीक पॅलेस बारवर अतिक्रमण विभागाने आपला मोर्चा वळविला. तळ अधिक १ मजली बांधकाम असलेल्या याबारमधील कारवाईत टेरेसवर बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड, आणि अंतर्गत फेरबदल करून मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले सर्व बांधकाम, फर्निचर तोडून टाकण्यात आले.
  • वंदना टॉकीज येथील पुष्पा विहार बारवर कारवाई करून विनापरवाना केलेले अंतर्गत बांधकाम तोडण्यात आले.
  • दरम्यान कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर्सना नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली. त्याचबरोबर उपवन येथील सूर संगीत बारवरही कारवाई करण्यात आली.