हुबळी एक्सप्रेसवर दरड कोसळली

तीन प्रवासी जखमी

मुंबई, 21 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

लोणावळा आणि खंडाळा स्थानकांदरम्यान मंकी हिलजवळ आज पहाटे दरड कोसळली. पहाटे पाचच्या सुमारास हुबळी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस(गाडी क्रमांक 17317) या मार्गावरून जात असताना एस 6 या स्लिपर डब्याच्या छतावर मोठा दगड कोसळला. या दुर्घटनेत तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर कल्याण येथील फोर्टिस आणि रेल्वे रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास हुबळी एक्सप्रेस या मार्गावरू जात होती. जोरदार पावसामुळे मंकी हिलजवळ दरड कोसळली मोठा दगड एक्सप्रेसवर आदळला. यामुळे डब्यात झोपलेले हसन बेलावंकी, आसिफ बेलावंकी, शिवप्रसाद यांना जबर दुखापत झाली.

मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा यांनी फोर्टिस रूग्णलयात जखमींची विचारपूस केली. हसन आणि आसिफ बेलावंकी यांना 25 हजार रूपये आणि शिवप्रसाद यांना 5 हजार रूपयांची मदत मध्य रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.