लोकमान्य टिळक टर्मिनसवर ४० दिवसांचा ब्लॉक

17 जानेवारीपासून 10 एक्सप्रेस एलटीटीईऐवजी ठाणे स्थानकापर्यंतच धावणार

मुंबई,ता. 17 जानेवारी 2017/AV News Bureau:

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसमधील एका रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीसाठी १७ जानेवारीपासून ४० दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत एलटीटीईला येणा-या दहा एक्सप्रेस ठाणे रेल्वे स्थानापर्यंतच चालवण्यात येणार आहेत. या एक्सप्रेस पुढीलप्रमाणे आहेत.

  1. 12545 रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस कर्मभूमी एक्सप्रेस
  2. 22512 कामाखया- लोकमान्य टिळक टर्मिनस कर्मभूमी एक्सप्रेस
  3. 11084 काजिपेट- लोकमान्य टिळक टर्मिनस ताडोबा एक्सप्रेस
  4. 22110 हजरत निजामुद्दीन- लोकमान्य टिळक टर्मिनस एसी एक्सप्रेस
  5. 12154 हबीबगंज- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  6. 15547 जयनगर- लोकमान्य टिळक टर्मिनस जनसाधारण एक्सप्रेस
  7. 15267 रक्सौल- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  8. 17317 हुब्बल्ली- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  9. 16346 तिरुवनंतपुरम- लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस
  10. 12620 मंगलूर- लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस