विक्रोळीतील काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ कार्यकर्ते भाजपात

मुंबई,2जानेवारी 2017/AV News Bureau:

विक्रोळी येथील कॉंग्रेसचे ज्‍येष्‍ठ कार्यकर्ते नारायण माहिते यांनी कार्यकर्त्‍यांसह बुधवारी मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या उपस्थितीत भाजपामध्‍ये प्रवेश केला.

मोहिते यांनी विक्रोळी कन्‍नमवार नगर मधून तीन वेळा काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. पक्षप्रवेशाच्‍या वेळी खासदार किरिट सोमय्या, भाजपा प्रदेश उपाध्‍यक्ष प्रसाद लाड,  मंगेश सांगळे, सुरेश सरनौबत, संजय यादवराव आदी उपस्थित होते.