पनवेलच्या काही भागात उद्या वीज नाही

 नवी मुंबई, २३ जानेवारी २०१७ /AV News Bureau:

विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांच्या देखभालीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेलच्या काही भागातील वीज पुरवठा उद्या खंडीत करण्यात येणार आहे.

  • ३३ के.व्ही.खारघर कामोठे या वीज वाहिनीवरील कामोठे नोड आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहील.
  • २२ के.व्ही.चिरनेर या वीज वाहिनीवरील झासई व चिरनेर सेक्शंनचा काही भाग आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहील.
  • २२ के.व्ही.प्रजापती या वीज वाहिनीवरील संपुर्ण प्रजापती वाहिनी आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहील, असे महावितरणच्यावतीने कळविण्यात आले आहे.