पनवेलमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल, 24 जानेवारी 2017/AVIRAT VAATCHAL NEWS :

पनवेलमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खादार रामशेठ ठाकूर यांनी या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

बंदर रोड येथे झालेल्या कार्यक्रमात विभागप्रमुख रुपेश पवार, शाखाप्रमुख कपिल कावळे यांच्यासह समर्थक कार्यकर्त्यांनी आणि ओम साई महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, श्रीकांत ठाकूर, प्रदीप सावंत, डी. आर. भोईर, महेंद्र कावळे, माजी नगरसेविका नीता माळी, अलक भगत, सुहासिनी शिवणेकर, मागासवर्गीय सेल जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोलंकी, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पूनम कल्याणकर, सायली ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष चिन्मय समेळ, उपाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, प्रीतम म्हात्रे आदी उपस्थित होते.