लढण्याची वेळ आमच्यावर आणू नका – आ. प्रशांत ठाकूर 

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

पनवेल,३ डिसेंबर२०१८:

कंत्राटी कामगारांवर दबाव कोणी आणू नका. या कामगारांच्या पदरात त्यांचा मोबदला टाकण्यासाठी आम्ही आलो आहोत, मात्र न्याय मिळाला नाही; तर दादा, भाई, कंत्राटदार व व्यवस्थापनाची तमा बाळगणार नाही. शेतकर्‍यांच्या लढ्यासाठी रक्त सांडलेल्या रायगडमधीलच मातीतील पनवेल-उरणवरून आम्ही आलो आहोत. कंत्राटी कामगारांचे शोषण थांबविण्यासाठी आलो आहोत. त्यासाठी वेळप्रसंगी शेवटच्या टोकापर्यंत लढू, परंतु शेवटच्या टोकापर्यंत लढण्याची वेळ आमच्यावर आणू नका; अन्यथा संघर्षास तयार असून, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कंत्राटी कामगारांच्या विरोधात भूमिका घेणार्‍यांना दिला आहे. ते धाटाव एमआयडीसीत बोलत होते.

  • रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीत असलेल्या निलिकॉन फूड डाईज अ‍ॅण्ड केमिकल लि. युनिट नं. 2, क्ल्यारियंट केमिकल आणि सुदर्शन इंडस्ट्रीज केमिकल लि. कंपनी येथील कंत्राटी कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे, त्याचा नामफलक अनावरण सोहळा शनिवारी (1 डिसेंबर) प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाला.

 

  • यावेळी आपल्या भाषणात प्रशांत ठाकूर म्हणाले की, केंद्रात व राज्यात आमचे सरकार आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे आमच्या कंत्राटी कामगारांवर दबाव कोणू आणू नये. आपल्याकडे एक म्हण आहे आयना का बायना घेतल्याशिवाय जायना. त्यामुळे कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क कंपनी व्यवस्थापनाकडून घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. 

=============================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्याशी वन टू वन चर्चा