माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे राष्ट्रवादीत

अकोला 24 जानेवारी 2017 /AVIRAT VAATCHAL NEWS:

शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी आज अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  प्रवेश केला.

अकोला युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम गावंडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जयंत गावंडे, मुर्तिजापूर शहर प्रमुख पप्पु तिडके,  नगरसेवक पंकज गावंडे, माजी नगरसेवक विशाल गावंडे यांच्यासह विविध तालुकाध्यक्ष, आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी  आ.प्रकाश गजभिये, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष कोरपे, माजी आमदार तुकाराम बीडकर, प्रदेश संघटक रामेश्वर पवळ, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, शहराध्यक्ष अजय तापडिया, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, ऋषीकेश पोहरे आदी मान्यवर उपस्थित होते.

गावंडे राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

गुलाबराव गावंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा  तटकरे यांनी यावेळी केली.