बेलापूर येथे 48 तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

नवी मुंबई, 26 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

बेलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 येथे काम करण्यासाठी मध्य रेल्वेने 27 डिसेंबरच्या मध्यरात्री 2 वाजल्यापासून 48 तासांचा (29 डिसेंबरच्या पहाटे 2 वाजेपर्यंत) ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. या ट्रॅफिक ब्लॉकमुळे हार्बरमार्गावरील बेलापूर स्थानकातून सुटणा-्या आणि बेलापूर स्थापर्यंतच्या काही लोकल रद्द करण्यात आल्या असून अनेक लोकल गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. traffic blcok at belapur station

  • हार्बरमार्गावर धावणाऱ्या एकूण गाड्या 604
  • ट्रॅफिक ब्लॉकच्या काळात रद्द केलेल्या गाड्या 34
  • ट्रॅफिक ब्लॉकच्या काळात 34 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामध्ये पनवेल येथून 18, नेरूळ येथू 4 आणि वाशी येथून 10 तसेच मानखूर्द येथून 2 गाड्या चालविण्यात येणार आहे.
  • सकाळच्या गर्दीच्या वेळी बेलापूर येथून सुटणाऱ्या 8 पैकी 7 गाड्या बेलापूर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून तर एक गाडी वाशी येथून सोडण्यात येईल.
  • संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी बेलापूरपर्यंत धावणाऱ्या 8 पैकी 5 गाड्या पनवेलपर्यंत चालविण्यात येतील. तर 1 गाडी वाशीपर्यंत धावणार असून 2 गाड्या रद्द केल्या आहेत.
  • बेलापूरपर्यंत धावणाऱ्या दिवसभरातील 65 पैकी 31 गाड्या रद्द केल्या आहेत. 18 गाड्या बेलापूरऐवजी पनवेलपर्यंत धावतील. तर 3 गाड्या नेरुळपर्यंत, 10 गाड्या वाशी आणि 2 गाड्या मानखूर्दपर्यंत चालविण्यात येतील.
  • ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत. शिवाय पनवेल, वाशी, मानखूर्द, चेंबुर, वांद्रे आणि अंधेरी दरम्यानच्या गाड्या वेळापत्रकानुसार धावतील.

गेल्या आठवड्यात बेलापूर, सीवूड-उरण रेल्वे मार्गाच्या कामासाठी हार्बर मार्गावर मोठा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला होता. सोमवारी दुपारपर्यंत हार्बर सेवा पूर्ण बंद ठेवण्यात आली होती. तर आज पेंटाग्राफ तुटल्यामुळे सुमारे सहा तास हार्बर सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. त्यात आत आणखी काम करण्यासाठी 27 डिसेंबरला मध्यरात्रीपासून पुढील 48 तासांसाठी ट्रॅफिक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, रेल्वे सेवा सुधारण्यासाठी कामे करण्यात येत असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

************************************************************************************************************************************************************************************