भाजयुमोचा उद्या मुंबईत कार्यकर्ता मेळावा

मुंबई, 25जानेवारी 2017:

आगामी  मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी रोजी मुंबई भाजपच्या वसंत स्मृती येथील कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यकर्ता मेळावा संध्याकाळी 5 वाजता होणार आहे.

या कार्यकर्ता मेळाव्याला भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष पुनम महाजन, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

 आगामी महापालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी भाजयुमोचे कार्यकर्ते सज्ज असून  निवडणुकीत फार मोलाची भुमिका बजावतील, असा विश्वास भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी व्यक्त केला.