गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 156 गणपती स्पेशल गाड्या

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 24 जून 2023

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वेच्या सहाय्याने 156 गणपती स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

1)मुंबई-सावंतवाडी रोड स्पेशल (40 सेवा)

अ)  01171 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर (20 ट्रिप) पर्यंत दररोज मध्यरात्री 12.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

ब)  01172 स्पेशल सावंतवाडी रोडवरून 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर (20 ट्रिप) दररोज दुपारी 3.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे

दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

डब्यांची रचना

18 स्लीपर क्लास, एका गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.

2) लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (24 सेवा)

अ) 01167 स्पेशल एलटीटी वरून 13, 14, 19, 20, 21, 24, 25, 26, 27, 28 सप्टेंबर आणि 1 व 2 ऑक्टोबर (12 ट्रिप) रोजी रात्री 10.15 वाजता सुटेल आणि आणि कुडाळला दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता पोहोचेल.

ब)  01168 स्पेशल कुडाळ येथून 14, 15, 20, 21, 22, 25, 26, 27, 28, 29 सप्टेंबर आणि  2 व 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता सुटेल. (12 ट्रिप) त्याच दिवशी रात्री 9.55 वाजता एलटीटीला पोहोचेल.

गाडीचे थांबे

ठाणे, पनवेल, रोहा.  माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

डब्यांची रचना

1 टू टायर वातानुकूलित,2 थ्री टायर वातानुकूलित, 10 स्लीपर, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 7 सामान्य द्वितीय श्रेणी.

 3) पुणे-करमाळी/कुडाळ-पुणे विशेष (6 सेवा)

अ) 01169 विशेष गाडी 15, 22 आणि 29 सप्टेंबर रोजी पुण्याहून संध्याकाळी 6.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता कुडाळला पोहोचेल.

ब)  01170 स्पेशल कुडाळहून 17, 24 सप्टेंबर आणि 1ऑक्टोबर रोजी दुपारी 4.05 वाजता सुटेल आणि पुण्याहून दुसऱ्या दिवशी पहाटे 5.50 वाजता पोहोचेल.

गाडीचे थांबे

लोणावळा, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.

डब्यांची रचना

1 टू टायर एसी , 3 थ्री टायर एसी, 11  स्लीपर, 6 जनरल सेकंड क्लाससह 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन.

 4) करमाळी-पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक) – 6 सेवा

अ)  01187 स्पेशल 16, 23,30सप्टेंबर (3 ट्रिप) रोजी करमाळी येथून दुपारी 2.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2.45 वाजता पनवेलला पोहोचेल.

ब)  01188 स्पेशल पनवेलहून 17, 24 सप्टेंबर  आणि 1ऑक्टोबर (3 ट्रिप) रोजी पहाटे 5.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2  वाजता कुडाळला पोहोचेल.

गाडीचे  थांबे

थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, काकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, रोहा आणि माणगाव.

डब्यांची रचना

1 टू टायर एसी, 4 थ्री टायर एसी, 11 स्लीपर, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी.

5) दिवा – रत्नागिरी मेमू स्पेशल  (40 सेवा)

अ)  01153 स्पेशल दिवा येथून 13सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर (20 ट्रिप) दरम्यान सकाळी 7.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2.55 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

ब)  01154 विशेष गाडी 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर (20 ट्रिप) दरम्यान दुपारी 3.40 वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता दिवा येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे

रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची रचना

12 कार मेमू रेक

 

6) मुंबई – मडगाव विशेष साप्ताहिक 40 सेवा

अ)  01151 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर (20 ट्रिप) पर्यंत दररोज सकाळी 11.50 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 2.10 वाजता मडगावला पोहोचेल.

ब)  01152 स्पेशल मडगावहून 13 सप्टेंबर  ते 2 ऑक्टोबर  (20 ट्रिप) दररोज पहाटे 3.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

गाडीचे थांबे

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

डब्यांची रचना

18 स्लीपर क्लास, एका गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.

या स्पेशल गाड्यांचे आरक्षण सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्क आकारून 27 जूनपासून सुरु करण्यात येणार आहे.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र