रावसाहेब दानवे गुरुवारी विदर्भ दौऱ्यावर

मुंबई, 8 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गुरुवारी विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात  नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा या चार जिल्ह्यात पक्षाच्या प्रचारसभांना हजर राहणार आहेत.

दानवे ९ फेब्रुवारी रोजी सकाळी गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा येथील प्रचार सभेत भाषण करतील. दुपारी दीड वाजता चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे तर दुपारी साडेतीन वाजता वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात येळाकेळी येथील प्रचारसभेत उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी नागपूर शहरातील भाजपाच्या प्रचार सभांमध्येही ते भाषण करणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.