नवी मुंबईत10 मार्चला रोजगार मेळावा

नवी मुंबई, 2 मार्च 2017 /AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सुशिक्षत – बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळावा यासाठी  येत्या 10 मार्च   रोजी वाशी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या काळात वाशी सेक्टर 16 मधील मॉडर्न कॉलेजसमोरील कै. विमलताई धनाजी शिंदे बहुउद्देशीय इमारत येथे हा रोजगार मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व दिनदयाळ अंत्योद्य योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नवी मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्त विद्यमाने  या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या भव्य रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता इच्छुकांनी http://jobfair17.com या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. मेळाव्याच्या दिवशी आधारकार्ड, निवडणुक ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज 3 फोटो व बायोडाटा या प्रकारची कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. या भव्य मेळाव्यासंबंधित अधिक माहितीकरीता 8767085000 या टोल फ्री क्रमांकावर तसेच 022-27654140 / 022-40126301 / 02, 022-754053 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना नामांकित कंपन्यांमार्फत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये पात्रतेच्या अधीन राहून सरळ मुलाखतीव्दारे प्रत्यक्ष निवड व तात्काळ नियुक्ती पत्र दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी कौशल्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणा-यांसाठी VTP मार्फत समुपदेशन व मोफत कौशल्य प्रशिक्षणासाठी लाभार्थी नोंदणी केली जाणार असून करियर निवडीबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे.