जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना 12.5% भूखंड वाटप

JNPT 12.5% Draw

नवी मुंबई, 1 मार्च 2017/AV News Bureau:

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) प्रकल्पग्रस्तांसाठी 12.5 टक्के भूखंड वाटप योजने अंतर्गत दुसरी संगणकीय सोडत आज सिडको भवन येथे पार पडली.

गावनिहाय संपादित झालेल्या भूधारकांनी वा त्यांच्या कायदेशीर वारसांनी, त्यांची संपादित जमिनीशी संबंधित निवाडानिहाय पात्रता एकत्रिकरणाद्वारे भूखंड वाटपाकरिता संमती दिलेली आहे, अशा भूधारकांचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात आला होता. सदर भूधारकांना नव्याने विकसित करण्यात आलेल्या जेएनपीटी नोडमधील सेक्टर 2 मध्ये भूखंड इरादित करण्यात आले आहेत. एकूण 35 भूखंडांसाठी काढण्यात आलेल्या या सोडतीमध्ये कमीत कमी 2,000 चौ.मी. क्षेत्रफळाचा तर जास्तीत जास्त 3,659 चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड देण्यात आले आहेत. या सोडतीदरम्यान एकूण 83,990 चौ.मी. क्षेत्रफळाचे भूखंड देण्यात आले.

सोडतीची यादी मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (रायगड), सिडको भवन, भूमी व भूमापन (साटयो), सातवा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई व व्यवस्थापक (कार्मिक व औद्योगिक संबंध), जेएनपीटी, प्रशासन भवन, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट शेवा, नवी मुंबई या कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिडको महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://cidco.maharashtra.gov.in/ देखील सदर यादी उपलब्ध आहे.