आज हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई, 12 मार्च 2017 /AV News Bureau:

रेल्वे मार्ग तसेच इतर तांत्रिक दुरूस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर कुर्ला- वाशी दरम्यान आज मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. तर मेन लाइनवर मेगा ब्लॉक यावेळी करण्यात आला नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

कुर्ला-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • सकाळी 10.35 ते दुपारी 3.27 या काळात सीएसटी ते पनवेल/बेलापूर/वाशीला जाणाऱ्या सर्व डाउन गाड्या आणि सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 या काळात पनवेल/बेलापूर/वाशीवरून सीएसटीला जाणाऱ्या अप मार्गावरील गाड्या बंद राहणार आहेत.
  • या मेगाब्लॉकदरम्यान सीएसटी-कुर्ला आणि वाशी दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील. तसेच सकाळी 10 ते सायंकाळी 4 या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर/मेन लाइन मार्गावरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.