लॉकडॉऊनच्या निर्णयाविरोधात मुंबईत व्यापाऱ्यांची उग्र निदर्शने

भाजपचे माजी आमदार राज पुरोहीत आणि माजी आमदार व ज्येष्ठ नगरसेवक अतुल शाह यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी आक्रमक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, ८ एप्रिल २०२१

महाविकास आघाडीने लावलेल्या लॉक डाऊन सदृशः परिस्थिती विरोधात भाजप आक्रमक झाली असून आज सी पी टॅंक, पांजरापोळ, भुलेश्वर, काळबादेवी , भेंडी बाजार, नळबाजार,झवेरी बाजार, येथील , स्टील मार्केट, इमिटेशन ज्यूवेलरी,रंग मार्केट, हार्डवेअर,दागिना तसेच कपड्याचे व्यापाऱ्यांनी भाजपचे माजी आमदार राज पुरोहीत आणि माजी आमदार व ज्येष्ठ नगरसेवक अतुल शाह यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने केली.

यावेळी व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचे आवाहन केले त्याबरोबर शनिवार व रविवार ह्या दोन दिवशी संपूर्ण लॉक डाऊन ठेवण्याची तयारी दर्शविली आहे.

राज्य सरकारने अशाप्रकारे जर लॉक डाऊन लावला तर सर्व व्यापारी आणि त्यांच्याकडे काम करणारे कामगार ह्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व व्यापारी उद्यापासून ह्या लॉक डाऊन सदृश स्थिती मागे घेऊन सोमवार ते शुक्रवार दुकान चालू ठेवण्याचा निर्णय येईपर्यंत आपापल्या दुकानाबाहेर काळे झेंडे लावून उभे राहतील त्यात दक्षिण मुंबईतील काही कार्यालयातील कर्मचारी देखील सामील असतील, अशी माहिती अतुल शाह यांनी दिली.

ह्या लॉक डाऊन विरोधी निदर्शनाचे नेतृत्व  माजी आमदार राज के पुरोहित, नगरसेवक व माजी आमदार अतुल शाह , नगरसेवक आकाश पुरोहित,  जयेश शाह, नूतन सोनी, .प्रेमशंकर पांडे, राजुभाई ठक्कर, सुनील शाह,  अरुण मोरसावाला आणि विविध व्यापारी संघटनेचे प्रमुख यांनी केले.

========================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप