ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या पुनर्बांधणी प्रस्तावाला मान्यता

डॉ.दीपक सावंत यांची माहिती

मुंबई, 30 मार्च 2017/AV News Bureau:

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणी प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे काम पावसाळयानंतर सुरु करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानपरिषदेत दिली.

ॲड. निरंजन डावखरे, किरण पावसकर यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.

रुग्णालयाच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. आता येथे 574 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात येईल. पावसाळ्यानंतर हे काम हाती घेण्यात येणार असून त्याला गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.