कोकण रेल्वे खोळंबणार ?

  3 दिवस नागोठणे-रोहादरम्यान ट्रॅफिक ब्लॉक

नवी मुंबई, 30 मार्च 2017 /AV News Bureau:

रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम करण्यात येणार असल्यामुळे मध्य रेल्वेच्या नागोठणे आणि रोहा दरम्यान 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी ट्रॅफिक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या तीन दिवसांत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या ट्रॅफिक ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना फटक बसण्याची शक्यता आहे.

 ट्रॅफिक ब्लॉकचे वेळापत्रक

  1. 30 मार्च (गुरुवार) -3 तास (दुपारी 12 ते सायंकाळी 3 वाजेपर्यंत)
  2. 31 मार्च (शुक्रवार) 6 तास (दुपारी 12.35 ते सायंकाळी 6.35 वाजेपर्यंत.रोहा स्टेशनजवळील कामासाठी) आणि दुपारी 12.45 ते सायंकाळी 6.45 या काळात 6 तासांसाठी नागोठणे रेल्वे स्थानकाजवळ)
  3. 1 एप्रिल (शनिवार) 2 तासांसाठी ट्रॅफिक ब्लॉक आणि 1 तासाचा आणखी ट्रॅफिक ब्लॉक.

30 मार्च रोजीचे गाड्यांचे वेळापत्रक

  • डाउन गाड्या:
  1. गाडी क्रमांक 71089 दिवा-रोहा डीएमयु ही नागोठणे रेल्वे स्थानकापर्यंत चालविण्यात येईल.
  2. गाडी क्रमांक 71095 दिवा-रोहा ही गाडी देखील नागोठणे रेल्वे स्थानकापर्यंत चालविण्यात येईल.
  3. गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस- थिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस ही पेण स्थानकात 1 तास 15 मिनिटांसाठी थांबविण्यात येईल.
  • अप गाड्या:
  1. गाडी क्रमांक 71096 दिवा-रोहा ही नागोठणेपासून धावेल.
  2. गाडी क्रमांक 22630 तिरुवनेली- दादर एक्सप्रे ही गाडी मार्गावरच काही ठिकाणी थांबविण्यात येईल. त्यामुळे ही गाडी दुपारी 3.10 ऐवजी सायंकाळी 7 वाजता दादर स्थानकात पोहोचेल
  3. गाडी क्रमांक 16346 थिरुवनंतपुरम सेंट्रल- लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस गाडी काही काळासाठी रोहा स्थानकात थांबेल आणि  निर्धारित वेळेपेक्षा 3 तास 10 मिनिटे उशिराने धावेल.
  4. गाडी क्रमांक 11086 मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस डबल डेकर गाडी 3 तास विलंबाने एलटीटी स्थानकात पोहोचेल.

31 मार्च रोजी रोहा ते नागोठणे दरम्यान सकाळी 11.55 ते सायंकाळी 5.55 याकाळात ट्रॅफिक ब्लॉक करण्यात येणार आहे.

  • रद्द केलेल्या गाड्या:

1 एप्रिल रोजीची गाडी क्रमांक 50119 दिवा-पनवेल पॅसेंजर गाडी तसेच 31 मार्च रोजीच्या गाडी क्रमांक 50104 रत्नागिरी-दादर पॅसेंजर आणि गाडी क्रमांक 50103 दादर-रत्नागिरी पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत.

  • डाउन गाड्या:
  1. गाडी क्रमांक 71089 दिवा-रोहा ही गाडी कासु रेल्वे स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.
  2. गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस-थिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस ही गाडी 11.40 ऐवजी 2.20 ला सुटेल आणि कासु रेल्वे स्थानकातही 50 मिनिटांसाठी थांबविण्यात येईल.
  3. गाडी क्रमांक12619 लोकमान्य टिळक टर्मिनस- मंगलोर एक्सप्रेस ही गाडी पेण स्थानकात 50 मिनिटांसाठी थांबविण्यात येईल.
  4. गाडी क्रमांक 10111 मुंबई-मडगाव कोकण कन्या ही 31 मार्च रोजी रात्री 11.5 ऐवजी 11.55 ला सीएसटी स्थानकातून सुटेल.
  • अप गाड्या:
  1. गाडी क्रमांक 71092 रोहा-दिवा ही गाडी नागोठणेपासून चालविण्यात येईल.
  2. 71096 ही गाडी कासु स्थानकापासून चालविण्यात येईल.
  3. गाडी क्रमांक 16346 थिरुवनंतपुरम सेंट्रल- लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस ही काही काळासाठी रोहा स्थानकात थांबविण्यात येईल आणि निर्धारित वेळेपेक्षा 20 तास उशिरा पोहोचेल.
  4. गाडी क्रमांक 10104 मडगाव-मुंबई सीएसटी ही गाडी 40 ऐवजी 10.25 ला सीएसटीला पोहोचेल.
  5. 31 मार्च रोजी गाडी क्रमांक 50106 सावंतवाडी –दिवा पॅसेंजर गाडी पनवेल स्थानकापर्यंत चालविण्यात येईल.

 1 एप्रिल रोजी रोहा यार्डात दुपारी 12.35 ते 3.35 या काळात ट्रॅफिक ब्लॉक केले जाईल.

  • डाउन गाड्या:

गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस- थिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस नागोठणे स्थानकात 30 मिनिटांसाठी थांबविण्यात येईल.

 अप गाड्या:

  1. गाडी क्रमांक 16346 थिरुवनंतपुरम सेंट्रल- लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस ही गाडी रोहा स्थानकादरम्यान काही काळासाठी थांबविण्यात येईल. ही गाडी एक तास विलंबाने धावेल.
  2. गाडी क्रमांक 11086 मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस डबल डेकर ही गाडी लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकात 7.10 ऐवजी 6.15 ला पोहोचेल.

 याशिवाय ट्रॅफिक ब्लॉकच्या दरम्यान पनवेल-वसई रोडदरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम होणार असून गाड्या विलंबाने धावणार आहेत.