भारताच्या इंटरसेप्टर क्षेपणास्राची यशस्वी चाचणी

rocket test

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2017:

शत्रूच्या क्षेपणास्राचा वेध घेणाऱ्या अत्याधुनिक इंटरसेप्टर क्षेपणास्राची भारताने शनिवारी यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात सकाळी 7.45 ला ही चाचणी करण्यात आली आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारत आता मोजक्या चार देशांच्या पंगतीत जावून बसला आहे.

शत्रू राष्ट्राने क्षेपणास्राने हल्ला केल्यास हवेतच त्याचा वेध घेवून नष्ट करणारी यंत्रणा विकसित करण्यासाठी भारत प्रयत्नशील होता. यासाठी डीआरडीओ प्रयत्नशील होती. आपल्या शास्रज्ञांनी अथक मेहनत करून ही  द्विस्तरीय क्षेपणास्र यंत्रणेतील महत्वाचा टप्पा गाठला आहे. या क्षेपणास्रामुळे शत्रूच्या आंतरखंडीय क्षेपणास्रांचा हवेतच पाठलाग करून नष्ट करण्याची क्षमता भारताने मिळवली आहे. यामुळे देशाची सुरक्षा अधिक भक्कम झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी यशस्वी क्षेपणास्र चाचणीबद्दल डीआरडीओच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानांचे अभिनंदन केले आहे. भारतासाठी ही मोठी उपलब्ध असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.