विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने हार्बर विस्कळीत

नवी मुंबई, 12 मे 2017/AV News Bureau:

पेंटाग्राफमधील विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे हार्बरमार्गावरील वाहतूक सेवा कोलमडली आहे. पनवेलकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे 1 तापासून बंद पडल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.  दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी वाशी ते पनवेल आणि वाशी ते ठाणे दरम्यान रेल्वे गाड्या चालविण्यात येत असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांनी दिली.

हार्बर मार्गावरील मानखूर्द- चेंबूरदरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका गाडीच्या पेंटाग्राफचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे हार्बर मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. कार्यालये सुटल्यामुळे घरी जाणाऱ्या नोकरदारांची गर्दी रेल्वे स्थानकांवर उसळली आहे. त्यातच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुले नोकरदारवर्गाचे हाल झाले आहे.