मुख्यमंत्री रविवारी पनवेलमध्ये

पनवेल, 20 एप्रिल 2017/ AV News Bureau:

पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील भाजप-रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खारघर व नवीन पनवेल येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

पनवेल महानगरपालिकेची निवडणूक 24 मे रोजी होणार आहे.भाजप-रिपाइंच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी खारघर येथील सेक्टर 19 मधील रामशेठ ठाकूर पब्लिक शाळेच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता तर सायंकाळी 6 वाजता नवीन पनवेल सेक्टर 13 मधील बांठिया शाळेच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

यावेळी रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.