स्थायी समिती सभापतीपदी सुरेश कुलकर्णी

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 10 मे 2018:

नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदासाठी आज झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी  कॉंग्रेसचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. कुलकर्णी यांना 9 मते मिळाली.

मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे हे या निवडणुकीसाठी पिठासन अधिकारी म्हणून उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सुरेश कुलकर्णी आणि शिवसेनेतर्फे दिपाली संकपाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. कुलकर्णी यांना 9 तर दिपाली संकपाळ यांना 6 मते मिळाली. सभापतीपदी कुलकर्णी यांची तिस-यांदा निवड झाली आहे.

नवनिर्वाचित सभापतींचे महापौर जयवंत सुतार, आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेता रविंद्र इथापे, विरोधीपक्ष नेता विजय चौगुले तसेच इतर पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी यांनी अभिनंदन केले.