तळोजा एमआयडीसीत वृक्षारोपण

नवी मुंबई, 18 जून 2017/AV News Bureau:

तळोजा इंडस्ट्रिज असोसिएशनच्यावतीने आज तळोजा एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे उपस्थित होते.

औद्योगिक पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याची गरज असते. ही बाब लक्षात घेवून तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेतला. आय.जी. पेट्रोकेमिकल्सचे जे.के. साबू यांनी या उपक्रमासाठी झाडे उपलब्ध करून दिल्याची माहिती तळोजा इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष आनंद शेट्टी यांनी दिली.

या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे,एमआयडीसीचे उपअभियंता संतोष कळसकर, टीआयएचे उपाध्यक्ष पी.व्ही. लोगावी, सदस्य बिनीत सालियन, सुनिल पडिहारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.