खारघर, द्रोणागिरी, उलवे भागात आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवीमुंबई, 17 सप्टेंबर 2021

सिडको महामंडळाकडून खारघर, उलवे आणि द्रोणागिरी नोडमधील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारण्याकरिता हाती घेण्यात आलेल्या देखभालीच्या कामांसाठी 19 सप्टेंबर 2021 पासून काही मर्यादीत कालावधीसाठी दर आठवड्यातील ठराविक दिवशी संबंधित नोडमधील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.

सिडकोच्या वेळापत्रकानुसार द्रोणागिरी व मजीप्रा (जेएनपीटी) येथे दर रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल. त्याचप्रमाणे  खारघर नोडमध्ये दर सोमवारी सकाळी 8 ते मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत आणि उलवे नोडमध्ये दर मंगळवारी सकाळी 8 वाजेपासून ते बुधवारी सकाळी 7 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व आदल्या दिवशी पुरेसा पाणी साठा करून सिडकोस सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

===============================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप