गणेशभक्तांसाठी आणखी 8 गाड्या

20 आणि 21 ऑगस्ट रोजी तिकिट बूकींग सुरू

मुंबई, 19 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

गणेशोत्सवासाठी अधिकाधिक चाकरमान्यांना कोकणात जाणे सोयीचे व्हावे यासाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर आणखी 8 गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण 20 आणि 21 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर याआधी 202 गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये आता आणखी 8 गाड्यांची भर पडली आहे.

 

1) 01101/01102 मुंबई-चिपळुण विशेष (4 फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 01101 विशेष गाडी 21 आणि 25 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.45 ला सीएसएमटी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 8 .10 वाजता चिपळुणला पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01102 विशेष गाडी 21 आणि 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.45 ला चिपळुण स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.40 वाजता सीएसएमटी स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वारणे, करंजाडी, विन्हेरे, दिवानखवटी, खेड आणि अंजनी रेल्वे स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

  • या विशेष गाड्यांना 6 सीटींग क्लास आणि 6 जनरल क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

 

2)01461/01462 पुणे-सावंतवाडी रोड-पुणे (2 फेऱ्या)

  • गाडी क्रमांक 01461 ही विशेष गाडी 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.45 ला पुण्याहून सुटेल आमि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01462 ही विशेष गाडी 23 ऑगस्टो रोजी दुपारी 2.5 ला सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल आमि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.55 ला पुणे स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • या विशेष गाड्यांना लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड , रत्नागिरी, आडवली, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

  • या विशेष गाड्यांना 6 सीटींग क्लास आणि 9 जनरल क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

 

3)01271 मनमाड-करमाळी (1 फेरी)

  • गाडी क्रमांक 01271 ही विशेष गाडी 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4.15 ला मनमाड स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता करमाळी स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • या गाडीला नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

  • या विशेष गाडीला 3 टायर एसीचे 5 डबे, 12 स्लीपर क्लास आणि 5 जनरल क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

 

4)करमाळी-अजनी (1फेरी)

  • गाडी क्रमांक 01272 ही विशेष गाडी 23 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता करमाळी स्थानकातून सुटेल आमि दुसऱ्या दिवशी दुपारी 2.15 ला अजनी स्थानकात पोहोचेल.

गाडीचे थांबे

  • या गाडीला सावंतवाडी रोड, कुडाळ, रत्नागिरी, चिपळुण, खेड, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमानड, जळगाव, अकोला, मुर्तिजापुर, बडनेरा, चांदुर, धामणगाव, पुलगाव आणि वर्धा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

  • या गाडीला 3 टायर एसीचे 5 डबे, 12 स्लीपर क्लास आणि 5 जनरल क्लासचे डबे जोडण्यात येणार आहेत.

 

या गाड्यांचे तिकीट बूकींग

  • गाडी क्रमांक 01101 या गाडीचे तिकीट बुकींग 20 ऑगस्टपासून विशेष शुल्कासह सुरु होणार आहे. तर गाडी 25 ऑगस्टला सुटणारी गाडी क्रमांक 01101, 01461 आणि 01271 या गाड्यांचे तिकीट बूकींग विशेष शुल्कासह 21 ऑगस्टपासून आरक्षण केंद्र तसेच irctc.co.in  उपलब्ध होणार आहे.
  • या विशेष गाड्यांच्या अनारक्षित जनरल सेकंड क्लासचे तिकीट विशेष शुल्कासह मिळणार आहे.