घणसोलीत दोन मुलं बुडाली

नवी मुंबई, 30 ऑगस्ट 2017/AV News Bureau: (youth drown in creek)

घणसोली जेटी खाडी परिसरातील एका डबक्यात  पोहण्यासाठी गेलेल्या दोन  मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली.(youth drown in creek)

घणसोली येथील खाडी किनारपट्टी भागात असणाऱ्या साईबाबा मंदिराजवळच्या डबक्यात आज संध्याकाळी 5.15 च्या सुमारास अर्जुन जयस्वाल आणि आयुष तिवारी हि 16-17 वर्षांची मुले पोहोण्यासाठी  उतरली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. आजुबाजूच्या नागरिकांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (youth drown in creek)

दरम्यान, सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून नागरिकांनी समुद्रात, खाडीत जाण्याचे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.