आधारला पॅन कार्ड लिंक केलंत का?

 आजचा शेवटचा दिवस

मुंबई, 31 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

आयकर भरणा-या सर्वांसाठी आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी देण्यात आलेली मुदतवाढ आज संपणार आहे. जर लिंक केलं नाहित तर तुमचे पॅन कार्ड रद्द होईल आणि तुम्हाला आयकर भरता येणार नाही. तसेच नव्याने पॅन कार्ड काढावे लागणार आहे. त्यामुळे आधार कार्ड लिंक केले नसेल तर आजच करा.

आयकर विभागाने दिलेल्या जाहिरातीनुसार पॅन कार्ड आधारकार्डशी कसं लिंक करावं हे सांगण्यात आलं आहे. तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन UIDPAN लिहून 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे.

आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे.